मोतियाची फुले, कवी मन सर्व ऋतूत येणाऱ्या प्रसंगाला हसतमुख सामोरे जाणाऱ्या अनुभवाचे चित्रण करते. जीवन तत्वांची कास धरत, चुकत-माकत, शिकत पुढे जात अंतर्मनाचा शोध घेणारी कविता आपल्या समोर उलगडत जाते. कवी बालगोपालांपासून तरुण, ज्येष्ठ अश्या सर्व वयोगटा...
मोतियाची फुले, कवी मन सर्व ऋतूत येणाऱ्या प्रसंगाला हसतमुख सामोरे जाणाऱ्या अनुभवाचे चित्रण करते. जीवन तत्वांची कास धरत, चुकत-माकत, शिकत पुढे जात अंतर्मनाचा शोध घेणारी कविता आपल्या समोर उलगडत जाते. कवी बालगोपालांपासून तरुण, ज्येष्ठ अश्या सर्व वयोगटाच्या व सर्व सामाजिक थरांतील अनुभव काव्यबद्ध करत असताना विशेषत: लय, ताल आणि लोक गीतात सहज रमताना व त्यातील आनंद वाचकांना मुक्तहस्ते वाटताना सुख पावतो. आयुष्यातील संकटांना तोंड देताना खंबीर असणारा कवी समाजातील अज्ञानामुळे येणाऱ्या विकृतींवर कठोर आघात करताना कचरत नाही. लवकरच सर्वांच्या उत्तम भविष्याचे स्वप्न साकारणार आहे त्यादृष्टीने सार्थक प्रयत्न करण्याचे मार्गदर्शक आवाहन कविता करते. कवितेतून आशावादाचा स्रोत नकळतच झळकतो....