धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या बेड्यात आपले जीवन जगणारा श्रीकांत विश्वनाथ. प्रत्येक पुरूषार्थांचा अतिरेक आणि त्याच्या समोर निर्माण झालेली विचित्र परिस्थिती. जगाला वेगळ्याच दृष्टीने पहाणारा श्रीकांत विश्वनाथ आपल्या आदर्शवादी तत्वांनी जग बदलण्याचा म...
धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या बेड्यात आपले जीवन जगणारा श्रीकांत विश्वनाथ. प्रत्येक पुरूषार्थांचा अतिरेक आणि त्याच्या समोर निर्माण झालेली विचित्र परिस्थिती. जगाला वेगळ्याच दृष्टीने पहाणारा श्रीकांत विश्वनाथ आपल्या आदर्शवादी तत्वांनी जग बदलण्याचा मार्गावर निघला होता. वास्तविकतेचे चटके खाऊन, त्या वास्तविकतेत आपले सर्वस्व गमावून बसलेला श्रीकांत विश्वनाथ. आपल्या अघोरी तत्त्वज्ञानाचा उपयोग लोकांच्या सुखासाठी करणारा श्रीकांत विश्वनाथ. कितीही आदर्श वाद डोक्यात असला तरी वास्तविकता कोणाला छेदून काढत नाही. अर्थकारणात बधिर झालेला श्रीकांत. कौमार्य गरतेमधून प्रवास करणारा श्रीकांत विश्वनाथ. कौमार्य हा एक विचार आणि त्या विचारात एक आदर्श वाद कसा अस्तगत झाला त्याची ही कथा. कथा आहे श्रीकांत विश्वनाथ या कौमार्याची. श्रीकांत विश्वनाथ या आदर्शवादाला वास्तविकता शिकवणारा, त्याच्या सोबत सतत असणारा त्याचा मित्र विशाल. तसेच श्रीकांत नावाची आदर्शवादी ज्वाला आपल्या मध्ये सामावून घेण्याची शक्ती असलेली ती सुकुमारी श्रद्धा. त्या स्थिर पराक्रमी देहाला आपल्या सौम्यतेने आपल्या कक्षेत बंद करणारी पण शेवटी अयशस्वी होणारी ती सृहुंनारी. कामचक्र फिरले आणि अर्थ आणि काम पुरूषार्थात अस्तगत झालेला श्रीकांत विश्वनाथ. जगाला नवीनच ज्ञान देणारा हा दार्शनिक श्रीकांत विश्वनाथ. आपल्याच निर्माण केलेल्या विश्वात कसा गढून जातो आणि जगाच्या दृष्टीने कसा अस्तगत होतो त्याची ही कहाणी. स्पर्धेच्या भयाण महासागरात संवेदनांची एक तहान निर्माण करणारा हा दार्शनिक. वास्तवाच्या समोर एक आदर्श स्वप्न बघू पहाणारा हा दार्शनिक. हा पहा संन्यस्त श्रीकांत विश्वनाथ आणि हे पहा त्याचे संन्यस्त कौमार्य!