"ती" आणि इतर कथा “प्रेम” या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्या अडीज शब्दांत अगदी स्मपूर्ण सृष्टी सामावून जाते. लेखनाच्या नानाविध प्रकारांमध्ये सर्वात जास्त कोणत्या विषयावर लिहिलं गेलं असेल तर ते म्हणजे, प्रेम. सिद्धहस्त लेखकांपासून नवशिक्या ले...
"ती" आणि इतर कथा “प्रेम” या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्या अडीज शब्दांत अगदी स्मपूर्ण सृष्टी सामावून जाते. लेखनाच्या नानाविध प्रकारांमध्ये सर्वात जास्त कोणत्या विषयावर लिहिलं गेलं असेल तर ते म्हणजे, प्रेम. सिद्धहस्त लेखकांपासून नवशिक्या लेखकांपर्यंत या एका विषयावर शेकडो वर्षांपासून लिहिलं जात असूनही त्यातलं नावीन्य नेहमी ताजं आहे. “दहा पैकी दहा आणि इतर कथा” हा तीन लघुकथांचा एक संग्रह, माझा असाच एक प्रयत्न आहे. तुमच्यासमोर प्रेमाच्या विविध छटा एका नवीन शैलीत सादर करण्यासाठी. यामध्ये आयुष्याचा जोडीदार शोधणारी नायिका ‘स्वरा’ आहे. तसंच आपलं प्रेम मिळवण्यासाठी, लोकल ट्रेनमध्ये मित्र बनलेल्या काकांची मदत घेणारा ‘साहिल’ आहे. प्रेम समोर असूनही न ओळखू शकणारा ‘कैरव’ आहे. ‘भूमी’वर जीवापाड प्रेम करणारा ‘परीक्षित’ आहे. या सर्वांची स्वतःची एक कथा आहे. स्वतःची कैफियत आहे. पण सर्वांमध्ये एकाच समान गोष्ट आहे, ती म्हणजे ‘प्रेम’. मला खात्री आहे की वाचकांना या हृदयाची तयार छेडणाऱ्या कथा नक्की आवडतील. डॉ. संदीप टिळवे